महाराष्ट्र
4623
10
दादापाटील राजळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम
आदिनाथनगर- प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम
(दि.०८) रोजी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थिनीसाठी ॲड. उज्वलाताई गुलाबराव राजळे यांच्या “महिलांसाठी सुरक्षाविषयक कायदे” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी महिला सुरक्षेविषयी कायद्याबद्दल सखोल माहिती दिली, आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच शेवगाव पाथर्डीच्या मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या कार्याचा विशेष गौरव करून महिलांच्या सक्षमीकरणाचे उदाहरणं दिले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थिनी कु. सिद्धी बाफना हिने वक्तृत्व स्पर्धेत आनंद करंडक जिंकल्यामुळे गौरव करण्यात आला आणि सिद्धीने आपले विजयी भाषण केले केले. तसेच प्रथम वर्ष कम्प्युटर सायन्स या वर्गातील विद्यार्थिनी साक्षी बोरुडे हिने मनोगत व्यक्त केले. डॉ. एम.एस. तांबोळी यांनी ताराबाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा अनेक उदाहरणे देऊन महिलांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक सुनंदा बडे यांनी स्व. दादापाटील राजळे (भाऊ ) यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाविद्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणातील अडसर दूर केला असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा ॲड. उज्वलाताई राजळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. साधना म्हस्के यांनी केले, प्रा. अर्चना नवले यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर प्रा.योगिता इंगळे यांनी अनुमोदन दिले. या कार्यक्रमास सोबतच महिला विषयी पुस्तकांचे ग्रंथालयात प्रदर्शन भरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दुर्गा भराट यांनी केले तर
आभार प्रा. डॉ. निर्मला काकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संगणक विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत पानसरे, ग्रंथपाल डॉ. राजकुमार घुले आणि महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, तृतीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थीनीं यांनी प्रयत्न केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कार्यालयीन अधीक्षक विक्रमराव राजळे, डॉ. एम.एस. तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनी आणि शिक्षक उपस्थित होते.
Tags :

