आता सोप्या पद्धतीने घरबसल्या बनवा Driving License
By Admin
आता सोप्या पद्धतीने घरबसल्या बनवा Driving License
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 04 मे 2021
सध्या देशभरात सर्वञ लाॕकडाऊन असल्याने सर्व बंद आहे.परंतु नंतर लाॕकडाऊन नंतर बाहेर कुठे फिरताना गाडी चालवण्याचा परवाना आता आवश्यक आहे.त्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या Driving License काढू शकतो.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कामं ऑनलाईन करावी लागत आहेत. अशात जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढयचं असेल, तर केवळ 10 स्टेप्स फॉलो करुन हे काम घरबसल्या करता येईल. त्यासाठी वेबसाईटवर 350 रुपयांचं पेमेंट करावं लागेल.
- ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करण्यासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ वेबसाईटवर जावं लागेल.
- वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल, इथे ऑनलाईन सर्विसवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विसवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर समोर एक नवं पेज ओपन होईल, ज्यात राज्य सिलेक्ट करुन अप्लाय करावं लागेल.
- राज्य निवडल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, तिथे अनेक पर्याय दिसतील. त्या पर्यायांपैकी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याचा पर्याय निवडावा लागेल.
- ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवं पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जमा करावी लागतील हे सांगितलं जाईल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी माहिती खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरावी लागेल.
- माहिती भरल्यानंतर मागितलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करावी लागतील.
- कागदपत्र अपलोड केल्यानंतर स्कॅन फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
त्यानंतर नवं पेमेंट पेज ओपन होईल, जिथे आधीपासून ठरलेली रक्कम 350 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पर्यायांचा वापर करावा लागेल.
- सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होईल, ती डाउनलोड करुन आपल्या लॅपटॉप किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता.
माहिती व्यवस्थित वाचा.नक्कीच driving licence मिळेल.

