आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेत निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
आचार्य नागार्जुना विद्यापीठ, आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण/पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या चार खेळाडूंची निवड झाली आहे.
मुलींमध्ये ८७ किलो वजन गटात योगिता खेडकर तर मुलांमध्ये ६७ किलो वजन गटात संजय लोखंडे, ७३ किलो वजन गटात पांडुरंग गायकवाड व १०९ किलो वजन गटात गौरव डोईजड या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.सदर स्पर्धेत भारतातील ११ राज्यातील मुलांचे ११० तर मुलींचे ७५ विद्यापीठ संघ सहभागी होणार आहे.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.
त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख व सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.