टाकेद विद्यालयाचे नाशिक जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात यश
इगतपुरी तालुका न्यूज नेटवर्क-
१३ वे १४ वे नाशिक जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन ब्रम्हा व्हॅली अंजनेरी त्रंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते सदर प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील सर्वतिर्थ टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज टाकेद विद्यालयाचे जिल्हा स्तरावरून राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली.
माॅडेल स्मार्ट स्प्रेइंग मशीन- कु. प्रतीक्षा संतोष परदेशी हिने बनवले असुन यासाठी विशेष मार्गदर्शन शिक्षक श्री भालेराव अमोल सर, श्री मनसु संपत पवार सर यांचे मिळाले.
सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष व सचिव, संचालक तसेच सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व टाकेद परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.