महाराष्ट्र
मोहटा देवी गडावर ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ
By Admin
मोहटा देवी गडावर ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी येथे
शारदीय अवघड नवरात्रोत्सवास मोहटा देवस्थानात गुरुवारी (दि.३ ऑक्टोबर) पारंपारिक पद्धतीने प्रारंभ होणार असून, सोळा तारखेला कोजागिरी पौर्णिमेला सांगता होईल.
पंधरा दिवस चालणाऱ्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे संपन्न निसर्गाचे दर्शनसुद्धा भाविकांना होणार आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते यात्रा कालावधीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी माहिती दिली. जिल्हा न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली विश्वस्त मंडळाचा दैनंदिन कारभार चालतो. सर्व विश्वस्त, ग्रामस्थांचे यात्रा नियोजनासाठी सक्रिय योगदान लाभते. यंदा देवस्थान समितीतर्फे भाविकांची सोय व सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीजवळील घाटामधील
वळणापूर्वीच पायी संपन्न चालणाऱ्या भाविकांसाठी पायऱ्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. मंदिराजवळील वाहतूक कोंडी टळून भाविकांनासुद्धा कमी अंतर पडणार आहे. अत्यंत अवघड असा घाट वळण रस्ता आता फक्त वाहनांसाठी खुला राहील. गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता घटस्थापना होईल. मोहटे गावातून वाजत गाजत देवीचा सुवर्ण मुखवटा, सुवर्ण अलंकारांची मिरवणूक गडापर्यंत येईल. तीन ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबरपर्यंत दररोज रात्री भक्तनिवास समोरील पटांगणावर कीर्तन सोहळा संपन्न होऊन शनिवारी बारा तारखेला काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. सायंकाळी सीमोल्लंघन सोहळा गृहीत कामे होम वाजता सकाळी मूर्तीवर असते रात्री गोंधळ गाणी
होईल. 13 ऑक्टोबरला देवीची यात्रा होऊन 14 तारखेला सकाळी कलाकारांच्या हजेरी व दुपारी कुस्त्यांचा हंगामा होईल. 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमेच्या महापूजेनंतर उत्सवाची सांगता होईल. भाविकांची यंदा गर्दी वाढण्याची शक्यता धरून सर्व यंत्रणांकडून वेगाने पूर्ण होत आहेत. अष्टमीचा 11 ऑक्टोबरला सकाळी आठ सुरू होईल. 12 ऑक्टोबरला कावडीचे पाण्याने देवीच्या जलाभिषेक होईल. त्यादरम्यान भाविकांसाठी दर्शन बंद . नवरात्र काळात दररोज दुपारी जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल. वारकरी भजनी मंडळ, जागर, गीते, आराधी गीते, देवीची , सायंकाळी हरिपाठ व गडाला
प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. जिल्ह्याच्या विविध आगारातून व अन्य जिल्ह्यातून नवरात्र कालावधीत ज्यादा बसेस सुटणार असून, देवस्थान समितीचीसुद्धा बस वाहतूक उपलब्ध आहे. मोफत निवास, फराळ, औषधोपचार, अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छतागृह, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरता निवारा व्यवस्था, भव्य सभागृह, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असून, प्रशासनाने यात्रा कालावधीत गाभारा दर्शन सुविधा बंद केल्याने मुख्यदक्षिणापेटी समोरील आरती कक्षाचा वापर आरतीसाठी होणार आहे. मंदिरासह संपूर्ण गडाचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असेल. संपूर्ण मंदिरावर उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आले आहेत.