महाराष्ट्र
24547
10
सहावीतील विद्यार्थिनीवर अॕसिड हल्ला; आरोपी फरार
By Admin
सहावीतील विद्यार्थिनीवर अॕसिड हल्ला; आरोपी फरार
वडगाव पान येथील घटना
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात गावातील एका विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या १२ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकाने अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची
धांदरफळ (ता. संगमनेर) येथील रहिवासी असून वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह वडगाव पान येथे मामाकडे राहात होती. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळी अकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी जात होती. ती लोणी संगमनेर रस्त्यावरील महादेव मळा (हडकीचा
ओढा) परिसरातील सुनसान रस्त्यावर आली असता, एक तरुण तेथे दुचाकीवर आला. त्याने या मुलीला "जाधवांचं घर इकडंच आहे का," असे विचारले. व काही कळायच्या आत त्याने या मुलीवर अॅसिड फेकले व तो पळून गेला. या परिसरात रहिवासी वस्ती व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा घेत, या तरुणाने हे कृत्य केले.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. चिमुकल्या विद्यार्थिनीवर असा हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ शोधून कठोर कारवाई करावी, अन्यथा वडगाव पान येथे रस्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात पाटील यांनी दिला आहे. ही घटना गंभीर असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करावी, अशी मागणी होत आहे.
या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या पीडितेला तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच
परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमले आणि त्यांनी संताप व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
24547
10




