महाराष्ट्र
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी करावा
By Admin
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणासाठी करावा- आमदार मोनिकाताई राजीव राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
आज समाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामध्ये मोबाईल हे एक आधुनिक साधन आहे. या आधुनिक साधनाच्या वापराचे फायदे आणि तोटे असून विद्यार्थ्यांनी केवळ याचा वापर हा शिक्षणासाठीच करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्या दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप समारंभ ढवळेवाडी येथे आयोजित केला होता यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आमदार मोनिकाताई राजीव राजळे म्हणाल्या की राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील अनुभव भावी आयुष्यासाठी दिशादर्शक असतात. महाविद्यालयातून मिळणाऱ्या शिक्षणा व्यतिरिक्त ग्राम स्वच्छता, वेळेचे नियोजन, कृषी जीवन याविषयी ज्ञान शिबिरातून मिळते. पालकांनी केलेल्या कष्टाची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. तरुण हे देशाचे भवितव्य आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करून ज्ञानार्जन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ढवळेवाडीच्या सरपंच सौ. सीमा बाबासाहेब चितळे यांनी भूषवले. यावेळी बोलताना मा. श्री. झुंबरराव ढवळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आज घडीला समाजामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीचा फायदा घ्यावा.
आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करतात त्या कष्टाचे चीज विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. स्वयंसेवकांनी गावामध्ये केलेल्या कामाबद्दल स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी स्वयंसेविका कु. साक्षी घुले, कू. प्रियंका बावणे, स्वयंसेवक राहुल सावंत यांनी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले. तर डॉ. आसाराम देसाई यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. या कार्यक्रमासाठी हा मा. श्री. सुभाष बर्डे, मा. श्री. संदीप पठाडे, ह भ प मच्छिंद्र महाराज चितळे, ह भ प अर्जुन महाराज चितळे, मा. श्री. बाबासाहेब चितळे, मा. श्री. सुभाष माने, मा. श्री. शेषराव कचरे, ग्रामसेवक अश्विनी कटके, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. अस्लम शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका गायत्री साठे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दुर्गा भराट प्रा. महेश गोरे, प्रा बळीराम चव्हाण, प्रा. अंजुम सय्यद, प्रा. अर्चना नवले, श्री शिवाजी बर्डे यांनी परिश्रम घेतले.
Tags :
3846
10