वकिलाची ३६ लाखांची फसवणूक ५ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल
By Admin
लिओ हॉलीडेस टुर्स अँड ट्रॅव्हल्स" या बनावट कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा चुना लाऊन नगर शहरातील भामटा अजय बाळासाहेब जगताप हा आरोपी सहकुटुंब फरार गुंतवणुकीतून जादा परताव्याचे अमिष दाखवत नगरमधील वकिलाची ३६ लाखांची फसवणूक
५ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की एअरलाईनमध्ये टिकीट ब्लॉकींगसाठी गुंतवणुक करून त्याबदल्यात चांगल्या प्रकारे फायदा करुन देण्याचे अमिष दाखवत ५ जणांनी नगरमधील वकिलांची तब्बल ३६ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर मधील लिओ हॉलीडेस टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक अजयकुमार बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप (तिघे रा. गोकुळनगर, भिस्तबाग, सावेडी) व तेजश्री गणेश गायकवाड, गणेश बबन गायकवाड (रा. नांदेड सिटी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अॅड. श्रीकांत श्रीकृष्ण राजदेव (रा. प्रोफेसर कॉलनी, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची आरोपी यांचेशी ओळख झाली.
त्यानंतर त्यांनी फिर्यादी राजदेव यांना आमची लिओ हॉलीडेस टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या नावाने नोंदणीकृत कंपनी आहे. त्यामध्ये आम्ही एअरलाईन मध्ये टिकीट ब्लॉकींगसाठी गुंतवणुक करुन
त्याबदल्यात चांगल्या प्रकारे मोबादला करुन देतो असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी २५ जुलै २०२२ ते २२ एप्रिल २०२३ या दरम्यान सुमारे ३६ लाख रुपयांची गुंतवणूक या आरोपींकडे केली. मात्र अनेक दिवस उलटूनही त्यांनी त्यांनी कुठलाही मोबदला दिला नाही. त्यामुळे फिर्यादीने गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात •आली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ५ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. राजपूत हे करत आहेत.
आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांना फसवले
लिओ हॉलीडेस टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक असलेले आरोपी अजयकुमार बाळासाहेब जगताप, बाळासाहेब गंगाधर जगताप, जयश्री बाळासाहेब जगताप यांनी अनेक गुंतवणूकदारांना फसवलेले आहे. त्यांच्यावर यापूर्वी २ कोटी २१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी तोफखाना तर ८३ लाख ६१ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.
वरील सर्व कलम फसवणुकीचा आकडा जवळपास जवळपास 50 करोड आहे .तो स् विमानाचे तिकीट खरेदी करून नंतर बाजारात ब्लॅक णे विकतो .त्यातून जो नफा मिळतो त्यातले पैसे 5%,8%,10% या दराने परत देतो असे खोटे सांगत असे त्यासाठी त्याला मोठ्या रकमेची गरज लागत असे मग तो त्यासाठी तो लोकांकडून पैसे घेऊन त्यांना नोटरी व एक वर्षाचा व्याजासह चेक देत असे करोडो रुपये लोकांकडून घेतले आहेत पण तो पैसे परत देत नसल्याने त्याच्यावर 11 महिन्यापूर्वी पहिला गुन्हा दखल झाला आता पर्यंत 8 गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये राजेंद्र बविस्कर यांचे 1 करोड 16 लाख,किशोर बविस्कार यांचे 25 लाख ,श्रीमती अंजना थोरात यांचे 25 लाख ,श्री गणेश साठे यांचे 11 लाख ,डी. आर. केदार यांचे 1करोड 75 लाख,सुरेखा बोराडे यांचे 23 लाख, सोमनी यांचे 2 करोड 20 लाख अशी महितीतली रक्कम आसून असे बरेच लोक फसवणुक झालेले आहेत की ज्यांनी आजुन गुन्हे दाखल केले नाहीत असे गुन्हेगार मोकाट बाहेर राहून आणखी मोठा गुन्हा पुण्यासारख्या ठिकाणी करत आहेत व फरार राहून आणखी गुन्हा करण्याचा सपाटा चालू आहे ,या गुन्ह्यामध्ये त्याची बहीण तेजश्री जगताप परिवार सामील आहेत आपल्या कुटुंबासह हा भामटा अहमदनगर मधून फरार झाला असून पुणे नांदेड सिटी येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती आमच्या सूत्रांजवळ आहे तिथे राहून हेच फसवणुकीचे काम करत आहे
ताजा कलम
गुन्हा दाखल केलेले लोक तोफखाना पोलिस कोतवाली पोलीस कार्यालयात वारंवार विचारणा केली असता सांगतात थातुर मातुर उत्तर सांगतात काही फसवणुक झालेल्या लोकांना हा भामटा आरोपी वॉट्सअप मेसेज करून सांगतो की माझे पोलिस काहीच करू शकत नाहीत मी त्यांना MANAGE केलेले आहे याचा कोणी गॉडफादर आहे कां ??? केवळ अहिल्यानगर पोलिसांच्या हलगर्जी पणामुळे आरोपीचे फावत चालले आहे काही लोकांनी कर्ज काढून आरोपीला पैसे दिलेले आहेत तर काही मध्यमवर्गीय लोक आत्महत्या करण्याच्या विचारात पोहचले आहेत
अहिल्यानंर पोलिसांना "सद् रक्षणाय खाल निग्राहणाय" या भूमिकेत यावं लागणार आहे.