.आ. राजीवजी राजळे यांच्या ५५ व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
स्व. आमदार राजीवजी राजळे यांच्या ५५ व्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवार दि . ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ . ०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर येथून स्पर्धेची सुरुवात होणार असून दादा पाटील राजळे महाविद्यालय आदिनाथ नगर येथे स्पर्धेचा समारोप होईल . ही स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आलेली आहे . शालेय गट (१३ वर्ष ) इयत्ता पाचवी ते सातवी मुले /मुली यांच्यासाठी १ की.मी . , शालेय गट ( १६ वर्षे ) इ . आठवी ते दहावी मुले /मुली यांच्यासाठी 3 की.मी . व खुला गट यांच्यासाठी १२ की.मी . अंतर ठेवण्यात आलेले आहे . प्रत्येक गटातील प्रथम तीन स्पर्धकांना सन्मान चिन्ह , रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉ.रोहित अदलींग - ८८८८८१५६९९, डॉ. अतुल चौरपगार - ८३९०१२९१५०, डॉ. आसाराम देसाई - ९४२३२२३५५४, व प्रा. उमेश तिजोरे ९०२११५०३३० यांचेशी संपर्क साधावा . असे आवाहन प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले