महाराष्ट्र
32198
10
पाथर्डी तालुका पंचायत समितीतील रोजगार हमीचे दप्तर जप्त
By Admin
पाथर्डी तालुका पंचायत समितीतील रोजगार हमीचे दप्तर जप्त
चौकशीच्या भीतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दलालांचे धाबे दणाणले
पाथर्डी-नगर सिटी न्यूज live24 नेटवर्क
पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागात गेल्या चार वर्षांपासून प्रशासकराज आहे. दलालांच्या माध्यमातून योजनेचा बट्टाभोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पाथर्डी पंचायत समितीला अचानक भेट दिली. त्यांनी रोजगार हमी विभागाचे दप्तर ताब्यात घेतले आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत योजनेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रोजगार हमी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांमध्ये अपात्र लाभार्थ्यांना लाभदेणे. जॉब कार्ड नसलेल्यांना प्राधान्य. बनावट हजेरी दाखवून मजुरी काढणे. काम न करता पैसे उकळणे, बनावट
● कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसुन झोपा
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी खुर्चीवर बसुन झोपा काढतात. येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यावर नियंयत्रण ठेवण्याच्या भुमिकेत असले पाहीजेत मात्र असे होताना दिसत नाही. कार्यालयात झोपा घेणारे कर्मचारी किती निडर असावेत. वरीष्ठ देखील काहीच कारवाई करीत नाहीत याचे कारण समजत नाही, गटविकास अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना धाक का वाटत नाही. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कधीही कार्यालयात नसतात. राहुरीचा व पाथर्डींचा कार्यभार एकाच अधिकाऱ्याकडे आहे. जलजीवन मिशनचे काम निकृष्ठ व त्यामध्ये मोठी अनियमीतता आढळुन आली आहे.
सीईओ भंडारींच्या दौऱ्यानंतर पंचायत समितीत हजेरी वाढली
फोटो-मोजमाप, कामाचा आकार वाढवून बिले काढणे. जेसीबीचा सर्रास वापर करून मानवी श्रम टाळणे. एका गावाचे उतारे दुसऱ्या गावाला जोडणे असे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत. योजनेचा मुख्य उद्देश मजुरांच्या हाताला काम देणे आणि वैयक्तिक लाभ योजना राबवणे असला तरी प्रत्यक्षात विशिष्ट दलालांशिवाय काम होत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्येक कामात मलिदा न घेता अधिकारी-कर्मचारी काम करायला तयार नसल्याचेही उघड झाले आहे.
पाथर्डी पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाने दलालांच्या माध्यमातून या योजनांचा अक्षरशः बट्टाभोळ केल्याचे समोर येत आहे. विशेषतः काही ग्रामरोजगार सेवक व गावपातळीवरील दलालाच्या माध्यमातून अनेक अपात्र लाभाथ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती समोर
● भंडारींच्या दौऱ्यानंतर वर्दळ वाढली
सीईओ आनंद भंडारी यांनी पाथर्डी येथील पंचायत समितीला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली, तसेच लोकांच्या कामाबाबत शिस्त लावण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याऱ्यांचा दौरा झाल्यानंतर शुक्रवारी पंचायत समितीत अधिकारी व कर्मचारी नियमित हजर राहू लागले आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये नागरिकांची कामासाठी वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून आले असून काही प्रलंबित कामांना गती मिळाल्याचेही दिसून आले.
येत आहे. जॉब कार्ड नसतानाही अनेकांना प्रथमदर्शनी लाभ दिल्याची धक्कादायक बाबही उघडकीस येत आहे. भंडारी यांनी पंचायत समितीला भेट देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामकाजात शिस्तीचा अभाव, अस्वच्छता, लोकांच्या कामात दिरंगाई यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शिस्त लावण्याच्या सूचना दिल्यानंतर गुरुवारच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी अधिकारी-कर्मचारी नियमित हजर
राहू लागले. यामुळे पंचायत समितीत लोकांची वर्दळ वाढली असून कामकाज सुरू झाले आहे.
रोजगार हमीच्या नावाने मजुरांचा आणि शेतकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्या या यंत्रणेविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्या या कठोर भूमिकेमुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Tags :
32198
10




