महाराष्ट्र
174658
10
विद्यार्थी खेळाडूला शालेय क्रिडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जन्म दाखला आवश्यक
By Admin
इगतपुरी तालुका क्रिडा स्पर्धा नियोजन बैठक संपन्न
विद्यार्थी खेळाडूसाठी जन्म दाखला आवश्यक
शालेय क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे नियोजन करुन पार पाडाव्यात
इगतपुरी प्रतिनिधी - इगतपुरी शहर येथे महात्मा गांधी हायस्कूल व ज्यूनिअर काॕलेज इगतपुरी येथे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा सन २०२५-२६ वर्षाच्या नियोजन बैठक (दि.२१)संपन्न झाली.
या बैठकीसाठी
जिल्हा क्रिडा अधिकारी / सदस्य सचिव सुनंदा पाटील व श्री अविनाश टिळे , इगतपुरी तालुका क्रिडा नोंदणी अधिकारी सर्वैश देशमुख , मा.इ.ता.क्रिडा प्रमुख विजय सोनवणे, इगतपुरी तालुका क्रिडा प्रमुख दगडु तेलोरे तसेच एम.जी.हायस्कूलचे प्राचार्य शिंदे सर,पञकार अमोलराजे म्हस्के तसेच तालुक्यातील क्रिडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.
यावेळी जय श्री हनुमान देवता यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी आलेल्या प्रमुख पाहुणे यांचा फुल ,श्रीफळ,शाल देवून सन्मान करण्यात आला.यावेळी तालुका क्रिडा प्रमुख पदी दगडु तेलोरे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी त्याच्या सत्कार सन्मान केला.तसेच
राहुल पंडीत,रिजवान शेख, तौफीक सर यांचाही सत्कार सन्मान करण्यात आला.
प्रास्तविक श्री विजय सोनवणे यांनी मागील वर्षाच्या झालेल्या क्रिडा स्पर्धा बद्दल माहीती देवुन स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल सर्व क्रिडा शिक्षक यांचे आभार मानले.यावेळी क्रिडा अधिकारी अविनाश टिळे यांनी क्रिडा विषयक मार्गदर्शन केले.तसेच काही नवीन नियमावली सांगितली.
यावेळी प्रत्येक शाळाची खेळाडू आॕनलाईन नोंदणी होणे आवश्यक आहे. आॕनलाईन नोंदणी तारीख १५ आॕगस्ट पर्यत सुरू राहणार आहे.यामुळे लवकरात लवकर खेळाडू नोंदणी तसेच शाळा नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे.
जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी यावेळी विद्यार्थी खेळाडूंना यांचा जन्म दाखला असल्याशिवाय खेळात सहभागी होता येणार नाही.यासाठी आॕनलाईन खेळाडू नोंदणी साठी खेळाडूसाठी जन्म दाखला आवश्यक आहे.तसेच तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन सर्व क्रिडा शिक्षक यांना करण्यात आले.विद्यार्थी खेळाडूचा चांगला सराव करुन घ्या.त्यांना आवश्यक त्या खेळासंबधी नियम समजावून सांगा.स्पर्धा काळात विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य करा.शाळा नोंदणी वेळेवर करुन घ्या.विद्यार्थ्यांची माहीती अचूक आॕनलाईन भरावी.जिल्हा क्रिडा कार्यालय मार्फत देण्यात आलेली माहीती पुस्तिका वाचून अभ्यास करुन नियमावली समजावून घ्यावी.योग्य विद्यार्थी खेळाडुंची निवड करावी.विद्यार्थ्यांची वजन,उंची,ओळख खुण,शाळा जी.आर.क्रमांक,आधार कार्ड नंबर,पत्ता अचुक नोंद करावी.
जिल्ह्यातील
विद्यालयाना तीन लाखापर्यत क्रिडा निधी तरतूद करण्यात आली आहे.यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.विद्यार्थ्यांना दररोज व्यायाम व आहार यासंबंधी मार्गदर्शन करा.तसेच यावर्षीच्या शालेय क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे नियोजन करुन पार पाडाव्यात असे मत जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी महाजन सर यांनी आलेल्या सर्व मान्यवर तसेच शिक्षक प्रतिनिधी यांचे आभार मानले.
Tags :
174658
10





