महाराष्ट्र
18932
10
चांदगाव जि. प. प्रा. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
By Admin
चांदगाव जि. प. प्रा. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
चिमुकल्यांनी साकारलेल्या नृत्य, नाट्य, गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
पाथर्डी प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या कला गुणाला वाव देणारा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुलेचांदगाव येथे नुकताच गावचे सरपंच श्री रणजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपसरपंच श्रीमती वर्षा शेळके, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, उद्योजक भारत बांगर, शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ, केंद्र प्रमुख उध्दव बडे आदी उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलेला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम बसविण्यात आले होते.गणरायाच्या गीता मधून उपस्थित सर्व मान्यवरांचे आगळे वेगळे स्वागत करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, सामाजिक सलोख्यावर विविध गीते, उखाणे असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. बाल चिमुकल्यांनी साकारलेले नृत्य, नाट्य, गायन सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी उल्लेखनीय उपस्थिती नोंदवली. यामध्ये बाळासाहेब गोल्हार,राजेंद्र जायभाये,रामप्रसाद आव्हाड, विठ्ठल फुंदे, सुभाष खेडकर, शिवाजी ढाकणे, रावसाहेब कांबळे, सुनील खेडकर, रामदास दहिफळे, संतोष बोरुडे, दीपक बडे, उद्धव दौंड, विठ्ठल देशमुख, अशोक ढोले, ज्ञानदेव खेडकर, अशोक खेडकर, अविनाश पालवे, अण्णासाहेब साळुंखे, संजय फुंदे, अशोक कराड, रमेश कराड, बबन आंधळे,अशोक मरकड, निलेश क्षिरसागर हे शिक्षक उपस्थित होते. तसेच महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बालगोपाळांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्कृष्ट कार्यक्रम पाहून सर्व शिक्षक बंधू-भगिनी व गावातील पालकांनी विद्यार्थ्यांवर बक्षीसाचा वर्षाव केला. कार्यक्रम चे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री गहिनीनाथ शिरसाट यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश खेडकर, वंदना शिंदे, सर्व अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ बेग, प्रशांत शेळके, सुनिल खेडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री सुरेश खेडकर यांनी मानले.
या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना संतोष साप्ते यांनी पाणी बॉटल व जेवणाचा डब्बा वाटप केले.
Tags :

