.बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षातून स्वाभिमान शिकविला- प्रा. विठ्ठल बरसमवाड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
पाथर्डी प्रतिनिधी:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथ.व माध्य.तसेच विकास ज्योत उच्च माध्य.आश्रम शाळा शेकटे येथे शनिवार ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक विठ्ठल बरसमवाड हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बोलत होते. ते पुढे म्हणाले "गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली असता तो बंड करून उठेल,"म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षातून स्वाभिमान शिकविला,असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहित्यिक व विकास ज्योत आश्रम शाळेचे प्राचार्य पालवे एस.बी यांनी प्रतिमेचे पूजन केले.यावेळी अश्विनी दौंड,कु. भूमिका खेडकर,कु. पायल आघाडे, सोनाली दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सोनवणे ए. बी.,ज्येष्ठ शिक्षक जाधव बी.डी. ,कांजवणे डी.बी, फुंदे एस.बी,श्रीमती काटकर झेड.आर,श्री पालवे डी. डी., श्रीमती खेडकर, राजळे, पालवे तसेच सर्व शिक्षक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुंदे एस. बी. यांनी तरआभार श्री जाधव बी. डी. यांनी मानले.