महाराष्ट्र
8642
10
पाथर्डीत माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
By Admin
पाथर्डीत माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
चंपाबाई गाडे यांच्या स्मरणार्थ महिलांना साड्यांचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी:
दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि त्या निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात माता रमाईच्या प्रतिमेची पूजन करून व बौद्धाचार्य भीमराज शिंदे व श्रीपत दादा बळीद, यांनी त्रिशरण पंचशील घेऊन सुरुवात करण्यात आली. यामध्ये माता रमाईच्या जीवन कार्यावर सुंदर प्रबोधन मीनाताई शिंदे, आश्लेषा क्षेत्रे/काळोखे यांनी केले. राजरत्न डोळस, प्रज्ञा आनंद पंडागळे, प्राजक्ता मंगेश शिंदे, श्रेया ढेकणे इत्यादींनी सुंदर माता रमाई यांची गीते गाऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवली. या कार्यक्रमांमध्ये प्रताप मंगेश मंगेश शिंदे या विद्यार्थ्याने सुंदर भाषण केले. या निमित्ताने चंपाबाई मोहनराव गाडे यांच्या स्मरणार्थ गाडे परिवाराने उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप केले. त्याचबरोबर डॉ. प्रा. अशोक डोळस यांनी लिहिलेल्या,"आजच्या शिक्षणावर बोलू काही" या पुस्तकाचे अनावरण व वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्रीपत दादा बळीद, दिलीप सरसे, जगदीश गाडे, प्रा. डॉ.श्रीकांत काळोखे, प्रा.अशोक डोळस, प्रा.घोंगडे, श्रीकांत उर्फ पप्पू शेठ बोर्डे, दिगंबर गाडे, एकनाथ ठोकळ, रामदास सोनवणे, महेंद्र राजगुरु, आनंद पंडागळे, साहेबराव बळीद, कैलास वेलदोडे, रवींद्र कटके, गोरख थोरात परिवार, सखाराम शिरसीम,भीमराव शिरशीम, नाना गवारे, मिलिंद गवारे, राजेंद्र गवारे, भाऊसाहेब गवारे,बौद्धाचार्य कानिफ पटारे , अरुण थोरात, गोरख थोरात, चव्हाण परिवार यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सरसे, आभार दिगंबर गाडे तर सूत्रसंचालन गौतम ढेकणे यांनी केले.
तसेच या कार्यक्रमांमध्ये मनीषा एकनाथ ठोकळ, विजया वेलदोडे, पुष्पा दिगंबर गाडे, रमा गौतम ढेकणे, मीनाताई सरसे मॅडम, सुनीता बळीद, प्रज्ञा अशोक डोळस, ज्योतीताई आनंद पंडागळे, ज्योतीताई महेंद्र राजगुरू इत्यादी महिला सहभागी झाल्या होत्या.
Tags :
8642
10




