महाराष्ट्र
123630
10
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, माध्यमिक विद्यालय धामणगावात
By Admin
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, माध्यमिक विद्यालय धामणगावात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न
कवडदरा-
जनता सेवा मंडळ, नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा धामणगाव व माध्यमिक विद्यालय धामणगाव व जनता वस्तीग्रह धामणगाव, तालुका - इगतपुरी, जिल्हा- नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी 'भारतीय स्वातंत्र्य दिन' मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रथमता तिन्ही विद्यालयाच्या प्रांगणातून ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जी.प.प्राथमिक शाळा या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री.व्ही. डी. बैरागी सर, श्री. डी. व्ही. अहिरे सर, श्री.आर.सी. देशमुख सर आदी सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देशमुख सर यांनी केले. ध्वज पूजन श्री. बाळासाहेब गाढवे (माजी जिल्हा परिषद सदस्य धामणगाव),श्री. विष्णू नारायण गाढवे, श्री सोमनाथ विठ्ठल पेढेकर यांनी केले. ध्वजारोहण श्री. त्रंबक वाळू बरतड यांनी केले. ध्वज संचलन श्री. जी.व्ही. लहामगे सर यांनी केले. ध्वज प्रतिज्ञा श्री. समाधान गरुड सर यांनी केले.श्री.अविनाश पवार सर यांनी अमली पदार्थ विरोधी शपथ विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संगीतमय कवायत घेण्यात आले. त्यामध्ये खास करून डंबेल्स, काठी कवाईत, रिंग कवायत, राष्ट्रध्वज कवायत इत्यादी चा समावेश करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्ही. डी. बैरागी सर यांनी केले.
ध्वजस्तंभ सजावट तिन्ही विद्यालयाच्या महिला शिक्षिका व श्री. गवळी सर यांनी केली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत मा. श्री. बाळासाहेब गाढवे (माजी जिल्हा परिषद सदस्य धामणगाव) व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा वसईकर यांनी केले.
आभार प्रदर्शन श्री. अमरजीत सोनवणे सर यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी माजी जी.प.सदस्य बाळासाहेब गाढवे, गावचे पोलीस पाटील, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शाळेचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगावचेे कर्मचारी, पोस्ट ऑफिस कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आदींसह, तिन्ही विद्यालयाचे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags :
123630
10





