महाराष्ट्र
143361
10
महाराष्ट्र सरकारचा खान अकॅडमी इंडियासोबत करार
By Admin
महाराष्ट्र सरकारचा खान अकॅडमी इंडियासोबत करार; राज्यातील ६२ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार फायदा
नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५६६ शाळांना याचा लाभ
नाशिक न्यूज नेटवर्क
सगळ्या मुलांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या उद्देशाने खान अॅकॅडमी इंडियासोबत महाराष्ट्र सरकारने पाच वर्षांचा करार केला आहे. या अंतर्गत राज्यातील या सरकारी शाळांमधील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित, चांगल्या दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य मोफत मिळणार आहे.
राज्यातील ६२ हजारांपेक्षा जास्त व नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५६६ शाळांना याचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या मदतीसह सरकारी शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत, खान अॅकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातल्या ६२ हजारांपेक्षा अधिक शाळांमध्ये वापरले जाणार आहे.
कार्यक्रमांतर्गत, राज्यातील विद्यार्थ्यांना खान अॅकॅडमीचे जागतिक दर्जाचे, राज्य अभ्यासक्रमाशी पूर्णपणे संलग्न असलेले गणित आणि विज्ञानाचे साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेत आयुष्यभर विनामूल्य उपलब्ध होईल. हे साहित्य सगळ्या शाळा, शिक्षक आणि मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे, यासाठी खान अॅकॅडमी इंडिया आणि शिक्षण विभाग एकत्र मिळून काम करणार आहेत. एवढंच नाही, तर खान अॅकॅडमीच्या मदतीने मुले घरीही अभ्यास करू शकणार आहेत. महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात ४८८ शाळांपासून झाली होती. आता या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात होणार आहे.
राज्य सरकारचा खान अॅकॅडमी इंडियासोबत करार
राज्यभरातील ६२ हजारांवर शाळांमध्ये राबविणार उपक्रम
नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५६६ शाळांचा समावेश
महाराष्ट्र सरकारने खान अॅकॅडमी इंडियासोबत पाच वर्षांचा करार केला आहे, ज्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य मोफत मिळेल. या उपक्रमातून राज्यातील ६२ हजारांपेक्षा जास्त शाळांना, तसेच नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५६६ शाळांना लाभ होणार आहे. गणित आणि विज्ञान विषयांसाठी हे साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.
Tags :
143361
10





