माध्यमिक शिक्षक निवडणूकीत स्वाभिमानी परिवर्तन पॕनल विजयी
अहिल्यानगर-
अहिल्यानगर जिल्ह्यातील
माध्यमिक शिक्षक सोसायटी अहिल्यानगर सार्वत्रिक निवडणूक २०२५ या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी जो स्वाभिमानी परिवर्तन पॅनलला विश्वास दाखवला तो निश्चितपणे सार्थ ठरला आहे. तसेच खऱ्या अर्थाने मतदारांचा विजय झाला आहे. स्वाभिमानी पॅनल मध्ये असलेल्या सर्व सक्षम २१ उमेदवार विजयी झाल्याबद्दल शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित २१ संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. व पुढील सभासद हितवाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षक भारती संघटनेच्या शिलेदारांचे अभिनंदन केले. ज्यांनी गेल्या दहा दिवसापासून अहोरात्र प्रयत्न करून पॅनलला जो वेळ दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित संचालकांचे
प्रा.महेश मंदा विष्णु पाडेकर कार्याध्यक्ष
शिक्षक भारती पुणे विभाग (पुणे,अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा)उपाध्यक्ष
स्वाभिमानी परिवर्तन शिक्षक,शिक्षकेतर मंडळ अहिल्यानगर.( माध्यमिक सोसायटी सार्वत्रिक निवडणूक २०२५)
प्रसिद्धी प्रमुख
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले.