महत्त्वाची बातमी- सर्व वीजग्राहकांना महावितरणच्या वतीने नम्र निवेदन व संदेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 16 मे 2021, रविवार
भारतीय हवामान विभागाने दि.15.05.21 ते दि. 17.05.21 पर्यंत कोकण किनारपट्टी वरुन चक्रीवादळ जाणार असल्याचे वर्तवले आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा वाहून महावितरणच्या विज वितरण व्यवस्था मध्ये मोठ्या प्रमाणात वीजप्रणालीची पडझड/नुकसान होऊ शकते.
त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज सकाळी पासून ज्या काही विद्युत पुरवठ्याच्या तक्रारी आहेत त्या याच वादळामुळे आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करणेसाठी महावितरण चे कर्मचारी व अधिकारी सदैव तत्पर असतीलच. परंतु चक्री वादळाचा वेग जास्त असल्यास महावितरणच्या खांब व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते व त्या वेळेस विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास बिलंब लागू शकतो.
तसेच महावितरण चे खांब कोसळलेस किंवा विद्युत वाहक तारा तुटून पडल्यास विद्युत वाहक तारांच्या संपर्कात मनुष्य अथवा जनावरे येऊन प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी आपणास विनंती करण्यात येत की, आपण आपल्या आसपास कुठेही महावितरण चे खांब अथवा तारा तुटून पडल्यास त्याच्या संपर्कात येऊ नये व इतर कोणास येऊ देऊ नये. व सदर बातमी त्वरित आपल्या भागामध्ये नेमणुकीस असणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास अथवा अभियंत्यास अथवा उपकेंद्रास द्यावी. जेणेकरून आपण एखादी दुर्दैवी अपघाती घटना टाळू शकतो.