कुटुंबाचा समाजासाठी आदर्श उपक्रम - अस्थी विसर्जन न करता केले वृक्षारोपण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 18 मे 2021,मंगळवार
पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील आदर्श उपक्रम
सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे निसर्गातील मिळणारा ऑक्सिजन किती बहुमूल्य आहे, याची कल्पना अनेकांना आली. पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील लक्ष्मीबाई दिनकर आमले (वय १०३) या आजींचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूपश्चात आपल्या आईची मूर्ती कायमस्वरूपी जिवंत राहावी म्हणून कुटुंबातील मुलांनी आईच्या अस्थी व राख पाण्यात विसर्जन न करता शेतात खड्डा खणून तेथे अस्थी व राख ठेऊन वृक्ष लागवड केली. आईच्या मृत्यूनंतर तिची आठवण सदैव अबाधित राहावी, त्यातून गावासमोर एक आदर्श निर्माण व्हावा, आणि कोरोना काळामध्ये ऑक्सिजन साठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागते मात्र झाडांमधून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या ध्यासातून या कुटुंबाने तालुक्यातील अस्तगावात एक आदर्श ठेवला आहे. यावेळी दादाभाऊ दिनकर आमले, राम दिनकर आमले, ग्रामसेविका सारिका वाळुंज, तलाठी कोते व परिसरातील झुंबर आमले, सुमन आमले, उषा कसरे, परिगा पाटोळे, सकुबाई थिटे, दिलीप आमले, राहुल आमले, गोरक्ष काळे, सुरेश काळे, संगीता आमले, नंदा आमले आदी उपस्थित होते