पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय त्वरित रद्द करावा- सुभाषराव भागवत
पाथर्डी - प्रतिनिधी
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील
३३% टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर व असंविधानिक असून शासनाने ०७/०५/२०२१ रोजीचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाथर्डी च्या वतीने जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुभाषराव भागवत यांनी राष्ट्रपती व मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी,प्रांतधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाथर्डी तालुका वतीने अहमदनगर जिल्हा युवक कार्यध्यक्ष सुभाषराव भागवत यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी नायब तहसिलदार पंकज नेवसे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील ३३% आरक्षण रद्द करणारा दि.०७/०५/२०२१ रोजीचा शासन निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याने तो रद्द करावा तसेच मा.सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित याचिका मधील अंतिम निर्णायाचे अधिन राहुन मागासवर्गीयांच्या कोट्यातील पदोन्नतीची 33% रिक्त पदे बिंदु नामावली नुसार भरावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार नेवसे यांनी म्हटले की,आपल्या भावना आम्हांला समजल्या असुन त्या प्रशासनाच्या माध्यमातुन मा. जिल्हाधिकारी यांचेकडुन राष्ट्रपती, मुख्यमंञी यांना कळविण्यात येईल.
निवेदन देतांना सुभाषराव भागवत, बादल पलाटे, संदिप शेवाळे, अविनाश पाचरणे, संदिप गायकवाड आदींची उपस्थिती होती.