'या' लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांचा मुक्काम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 17 मे,2021 , सोमवार
दोन ते तीन दिवसानंतर कोवॅक्सिन या लसीचा दुसऱ्या डोस उपलब्ध झाला. त्यानुसार रविवारी १५० नागरिकांचे लसीकरण केले जाणार होते. ही माहिती समजताच प्रतिक्षेत असलेल्या श्रीरामपूरकरांनी लसीकरण केंद्रासमोर रात्रीच दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन मुक्काम करत नंबर लावले. यानिमित्ताने मात्र पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप होऊ लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प झाले होते. शनिवारी रात्री रविवारी कोवॅक्सिन या लसीचा दुसरा डोस दिला जाण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्र समोर आखून दिलेल्या नंबरवर रात्रीच आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून ठेवली. अनेकांनी याठिकाणीच मुक्काम ठोकला. लसीकरणासाठी नागरिकांना रात्र जागी राहून काढावी लागण्यासारखे दुर्दैव ते कोणते. या प्रकारामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याच्या भावना काही नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.