पाथर्डी- वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू,जिवीतहानी नाही
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक ठिकाणी वीज कोसळून वीज रोहित्र निकामी झाले आहे.
विजेच्या कडकडाटासह शुक्रवारी सायंकाळी पाऊस पडला. अचानकपणे मोठा आवाज झाला त्यात वीज कोसळली. यामध्ये जनावरांची मृत्यू झाला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील टेमकरवाडी येथे महादेव नाथू वारे यांचा एक बैल मृत पावला आहे. तर रांजणी येथील माणिक जिजाबा मुंडे यांच्या म्हशीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.