हनिट्रप प्रकरणात जाळ्यात ओढून बहीण भावाने एका व्यक्तीला फसवून पैशाला लुटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केडगावातील बहिण-भावाने पनवेलच्या (जि. रायगड) व्यक्तीला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अश्लील फोटोचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रूपये व तीन तोळ्याची सोन्याची चेन लुटली आहे. त्या व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पूजा कचरे व विक्रम कचरे (पूर्ण नावे माहिती नाही, रा. रभाजीनगर, केडगाव) यांच्याविरोधात जबरी चोरी, खंडणी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 8 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असून सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पूजा कचरे हिने फिर्यादीसोबत फोनवर गोड बोलून तिचा भाऊ विक्रम याच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे भासवून फिर्यादीकडून पाच लाख रूपये घेतले. फिर्यादी यांनी पूजाकडे पैशाची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकून तसेच अश्लील फोटोचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांचा वाहनाचा चालक याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन एटीएम काढून घेतले. पाच लाख रूपये दे, नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.