आमदाराच्या कार्याचा सन्मान म्हणून मातोश्रीचा पेढेतुला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत जामखेडचे नाव देशपातळीवर आ. रोहित पवारांच्या कार्यकर्तृत्वामुळे पोहचले आहे. असा आमदार म्हणजे मतदारसंघाचे भाग्य आहे. या पुत्राचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या मातेचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजत, स्वराज ध्वजाच्या पुजनाच्या निमित्ताने आ. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांची पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे व सुर्यकांत मोरे यांच्या परिवाराच्या वतीने हभप कैलास महाराज भोरे यांच्या हस्ते पेढे तुला करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सुर्यकांत मोरे, त्यांच्या मातोश्री पार्वती मोरे, विजयसिंह गोलेकर, मनोज भोरे, अशोक धेंडे, महादेव भोरे, बजरंग भोरे, शैलेंद्र भोरे, चरण कदम, संतोष कात्रजकर, बाळासाहेब डुचे, नितीन बचुटे, भैरवनाथ काळे, बाळासाहेब काकडी, मुबारक शेख, किरण मोरे, विलास भोरे, योगेश माने, गणेश भोरे, अक्षय मोरे, उमेश मोरे, बिभिषण मोरे, सुनिल भोरे, खंडू धेंडे, अविनाश भोरे, दत्ता भोरे, बाळासाहेब उगले, दादाराव जाधव राऊत सर मुख्याध्यापक देवदैठण यांच्या सह अनेक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.