विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी पूर्वतयारीत राहावे प्रा शरद बोडखे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयातील प्रा. शरद बोडखे यांनी यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना प्रा. बोडखे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःची स्टुडंट प्रोफाईल ची सर्व माहिती जतन करून ठेवली पाहिजे. त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरतांना वापरलेला मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे. विद्यार्थ्यांना स्टुडंट प्रोफाईल मधून ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी चा युजर आयडी व पासवर्ड, परीक्षेची लिंक, परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना मिळते. तसेच स्टुडंट प्रोफाईल मधून विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अडचणी आल्या तर तक्रार सुध्दा नोंदवता येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची स्टुडंट प्रोफाईल ची सर्व माहिती जतन करून ठेवली पाहिजे. आणि परीक्षेसाठी स्वतःची पूर्वतयारी ठेवावी असे प्रा. बोडखे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जर कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर विद्यापीठाकडून त्यावर कडक कारवाई केली जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यापासून सजग राहावे.
यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्रा. चौरे, प्रा. सुभाष शेकडे, प्रा. पालवे, प्रा. राख, प्रा. अभिमन्यू ढोरमारे, प्रा. वैशाली आहेर, प्रा. गुलडगड हे उपस्थित होते.
प्रा. सुभाष शेकडे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. अभिमन्यू ढोरमारे यांनी आभार मानले.