गडाख कुटुंबियांजवळ गेल्याने छळ, एकाची आत्महत्या; बहीणीने दिली फिर्याद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुळा एज्युकेशन साेसायटीमधील क्लार्क प्रतिक बाळासाहेब काळे याने सहकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतला. मयत प्रतिक याच्या बहिण प्रतिक्षा हिच्या फिर्यादीवरून सात जणांविराेधात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गाेरक्षनाथ कदम, विनायक दमाेदर देशमुख, राहुल जनार्धन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याणराव औटी, राऊसाहेब भीमराज शेळके, रितेश बबन टेमक यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. कदम, देशमुख, राजळे, बेल्हेकर आणि औटी हे मुळा एज्युकेशन साेसायटीमध्ये, तर शेळके आणि टेमक हे मुळा सहकारी साखर कारखान्यामध्ये नाेकरीला आहे.
मुळा एज्युकेशमध्ये हे सातही जण प्रतिक याला सिनिअर म्हणून काम करत हाेते. कामातील इनामदारीमुळे प्रतिक गडाख कुटुंबियांच्या जवळ पाेहाेचला हाेता. तेच या सात जणांना खटकत हाेते, असे फिर्यादीत म्हटले आहे. अत्यावश्यकता म्हणून अनामत रक्कम मागितली, ती देखील दिली नाही. त्याचबराेबर प्रतिककडून देशमुख यांनी नाेकरीचा राजीनामा लिहून घेतला. ताे मंजूर केला नाही. हाेणाऱ्या मानसिक छळाची कल्पना प्रतिकने फिर्यादी बहिण आणि भाऊ अक्षय याला दिली हाेती. याच त्रासाला कंटाळून प्रतिक याने २९ ऑक्टाेबरला समाज माध्यमांवरून भाऊ अक्षय याला व्हिडिओ पाठवून या सात जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यानंतर प्रतिकने नगर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात झाडाला गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला.