महाराष्ट्र
गणेश दिनकर यांची लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड
By Admin
गणेश दिनकर यांची लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुका काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गणेश दिनकर यांची महाराष्ट्र लहुजी सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली.
पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लहुजी सेनेचे संस्थापक- अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
भैरवनाथ भारस्कर म्हणाले की, जय लहुजी नारा घेऊन उपेक्षित दीनदुबळ्या लोकांना आपल्या महाराष्ट्र लहुजी सेना या संघटनेचे सभासद करून घेणे व आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना लोकशाही पद्धतीने आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, आपण सामाजिक काम करत असतांना आपले हित पाहता इतरांचे हित जोपासावे तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व उणीवांची जाणीव करून देणे, कारण समाजातील काही घटकांना आर्थिक जाणीव नाही. त्यांना समाजातील मतदान, रक्तदान, अन्नधान्याची पूर्णतः जाणीव करून देणे, कारण यावर सर्व अवलंबून आहे. जय लहुजी नारा हा समाजातील महत्त्वाचा नारा आहे आणि तो आपण आपल्या कार्यकर्त्याला शिकविणे. चळवळीचे महत्त्व पटवून देणे, हे आपल्या कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. आपण सामाजिक काम करत असताना महापुरुषांची जयंती आपल्या संघटनेच्या माध्यमातून साजरी करावी. आपल्याला महाराष्ट्र लहुजी सेना संघटनेचा बोर्ड लावण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत आहे.
यावेळी लहुजी सेनेचे संस्थापक- अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक नामदेव चांदणे ,पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शहानवाज शेख, सेवादल काँग्रेस जिल्हा सरचिटणीस समीर काझी, एस. सी. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिजोरे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रा. जालिंदर काटे,पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश शेलार,सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर डांगे, पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र पालवे,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सोलाट, पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संजय गोरे, शेवगाव इंडियन काँग्रेस ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक जमिर शेख, एस. सी. काँग्रेस तालुका संघटक संपत क्षेत्रे , एस. सी.काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष राजुशेठ क्षेत्रे, अल्पसंख्यांक काँग्रेस पाथर्डी तालुका उपाध्यक्ष नितीन खंडागळे ,एस. सी. काँग्रेस पाथर्डी शहर अध्यक्ष अमित काळोखे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता पाठक, पाथर्डी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष महेश दौंड, एस. सी. काँग्रेस तालुका सरचिटणीस आनंद पवळे, दिपक दिनकर,महाराष्ट्र लहुजी सेना नेवासा तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब सरोदे, नेवासा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर सरोदे आदींची उपस्थिती होती.
Tags :
26500
10