कवडदरा विद्यालयाला भारत सर्व सेवा संघ संस्थेचे सचिव प्रकाशजी जाधव व संचालक हनुमंताजी पाटील यांची भेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अमोल म्हस्के
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात
शालेय कामकाज पाहण्यासाठी तसेच संस्थेच्या सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी संदर्भात भारत सर्व सेवा संघ पाचेगाव,
अहमदनगर संस्थेचे सचिव श्री.प्रकाशजी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.
विद्यालयाच्या प्राचार्या सौ.जे.एस.नायकवडी यांनी संस्थेचे सचिव श्री.प्रकाशजी जाधव व संचालक श्री. हनुमंताजी पाटील यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले.त्याच प्रमाणे संस्थेचे सचिव श्री. प्रकाशजी पा.जाधव यांना ज्ञानोदय शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान टाकळीभान यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय ज्ञानोदय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने फुलगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सहविचार सभेमध्ये
संस्थेचे सचिव श्री.
प्रकाशजी जाधव आणि संचालक श्री.हनुमंताजी पाटील यांनी
विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय कामकाजासंबधी तसेच संस्थेतील सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी
संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच सेवकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.