विजेचा शाॕक लागल्याने मुलगी जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर तालुका :
नगर तालुक्यातील विजेचा शॉक लागल्याने मुलगी जखमी तर, शेळी ठार झाल्याची घटना जेऊर येथे गुरुवारी घडली. यावेळी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जेऊर येथील लिगाडे वस्तीवर विद्युत वाहिनी तुटल्याने जमिनीवर पडली होती. तेथे शेळ्या चारणारी मुलगी चैत्राली भाऊसाहेब तोडमल (वय १२) हिला विजेचा झटका बसल्याने जखमी झाली तर एक शेळी तारेला चिकटल्याने जागेवरच मरण पावली.
विद्युत वाहिनी जमिनीवर पडलेली असताना याची कल्पना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. तरीही दोन दिवस त्या तारा जमिनीवरच पडून होत्या. त्यामध्ये सप्लाय चालू असल्याने आजची दुर्घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनटक्के, माजी उपसरपंच बंडू पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलाठी सुदर्शन साळवे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
जखमी झालेल्या मुलीला नुकसानीची भरपाई तत्काळ मिळण्याची मागणी रविराज तोडमल, सोमनाथ तोडमल, अक्षय तोडमल, अनिल तोडमल, गणेश तोडमल, विलास जाधव, वैभव तोडमल, नंदू तोडमल यांनी केली आहे.