महाराष्ट्र
मोहटादेवी देवी येथे घटस्थापना, मंदिर खुले, पण यात्रा नाही!
By Admin
मोहटादेवी देवी येथे घटस्थापना, मंदिर खुले, पण यात्रा नाही!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जागृत देवस्थान असणारे मोहटादेवी गडावर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत विधीवत व धार्मिक उपचारांच्या मंत्रघोषात घटस्थापना करण्यात आली
देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर व सौ आरती कुर्तडीकर यांचे शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला . परंपरेप्रमाणे मोहटादेवी चा सुवर्ण मुखवटा व अलंकार दर्शनासाठी मोहटे गावातून मोटारीद्वारे देवी गडावर आणण्यात आले.घटस्थापनेच्या कार्यक्रमाचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न नारायण देवा सुलाखे ,राजू देवामुळे, भूषण साखरे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत केले.
मंदिरे उघडून कोव्हिडं 19 चे नियम पाळणे बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार देवस्थाने ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केली आहे या व्यवस्थे प्रमाणे सकाळी सात वाजता अहमदनगर येथुन पायी दर्शनासाठी आलेले बांधकाम अभियंता राहुल शेळके व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक बबन शिंदे यांनी सर्वप्रथम या सुविधेचा लाभ घेतला. ऑनलाइन सेवेमुळे व देवस्थाने केलेल्या स्वागत यामुळे तसेच सुमारे सहा महिन्याच्या कालानंतर त्यांचे हस्ते देवी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.यावेळी देवीचा जयजयकार करण्यात आला. देवस्थान समितीने त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र शासनाने मंदिर भाविकांचे दर्शनासाठी खुले करण्याबाबतच्या आदेशामध्ये नमूद अटीनुसार सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क चा योग्य पद्धतीने वापर, हातांची स्वच्छता आणि त्याचा वापर करणे यासह हार, फुल, खण, नारळाची ओटी इत्यादी बाबींना मनाई अशा विविध अटीवर मर्यादित भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.
गडावर जमावबंदी लागू करण्यात आलेला आहे. यात्रा रद्द करण्यात आलेली असून केवळ धार्मिक स्थळ भाविकांना दर्शनासाठी खुली अटी व शर्तींवर केलेली आहेत. यामुळे मोहटादेवी गडावरील ज्योत आणणे, घटी बसणे, भजन-कीर्तन यासह कावड, कलावंत यांच्या हजेऱ्या व मल्लांचा हंगामा रद्द करण्यात आलेला आहे.
पिंपरी चिंचवड येथील भाविक राजेंद्र भोंडवे यांनी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केली. देवस्थान कर्मचाऱ्यांनी मंदिरात आकर्षक रोषणाई केल्यामुळे रात्री मंदिर रोषणाईने उजळून उजळले
घटस्थापनेच्या वेळी भिमराव पालवे , डॉ ज्ञानेश्वर दराडे, आजिनाथ आव्हाड, दहिफळे, आदी विश्वस्त उपस्थित होते. देवी गडावर वाहने जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे तीन किलोमीटरवरील बीड रस्त्याच्या कमानीजवळ वाहने पार्किंग ची व्यवस्था असल्याने भाविकांना पायी देवी गडावर यावे लागत आहे
भाविकांनी ऑनलाइन पास साठी या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन मोहटादेवी देवस्थान चे वतीने करण्यात आले आहे——-http://www.shrimohatadevi.org
Tags :
347
10