चिंचपुर इजदे येथील जवाहर विद्यालयात हात धुवा दिन साजरा
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जवाहर विद्यालयात नुकताच जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात त्याचे महत्त्व ठसवावी, या विषयी जागरण व्हावे, म्हणून १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर यांनी हात धुवा दिनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्या गायकवाड हे होते. त्यांनी हात धुण्याचे महत्त्व विशद करतांना म्हटले, स्वच्छतेची काळजी विद्यार्थ्यांनी स्वतः घेतल्यास रोगराईपासून त्यांचे संरक्षण होते. प्रत्येकाने आपले हात वारंवार साबण पाण्याने धुतल्याने कोरोना तसेच इतर आजारापासून स्वतःचे रक्षण करू शकतो.
याप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी हँडवॉश तसेच साबण पाण्याने हात स्वच्छ धुतले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक विशाल उदमले, धनंजय घायाळ, निलेश फुंदे, रवींद्र खेडकर, सुभाष डोळे, सुरेखा माळवे, धनश्री शिरसाट, भुजंग डमाळे, सुभाष जायभाये, उद्धव लोखंडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बडे यांनी केले तर आभार वैभव खुटाळे यांनी मानले.