आश्वासन न देता काम करण्यावर भर देतोय 'यांनी' केले मत व्यक्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ऊजा मंञी प्राजक्त तनपुरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब असून या कुटुंबातील सर्वांना सारखी वागणूक दिली जाईल. तुम्ही प्रवेश करताना जे प्रश्न मांडले, त्यातील विजेचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रहक्काने मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकप्रतिनिधींधकडून तुम्हाला केवळ आश्वासनेच मिळाली असतील. मात्र, मी आश्वासन न देता वस्तुस्थिती पाहून प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो. असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
ते राहुरीत बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या युवकांचे उपाध्यक्ष व वरशिंदे गावचे उपसरपंच दीपक वाबळे, आप्पासाहेब नेहे, एकनाथ विधाटे, गणेश नेहे या भाजपाच्या चार सदस्यांनी कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
तसेच पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेणारा मी कार्यकर्ता नाही. प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करता येईल? याचा अभ्यास करून मार्गक्रमण करतो, अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी विरोधकांना शाब्दिक टोला लगावला आहे.
दरम्यान गावातील विकास साधण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल.
या गावातील पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, रस्ते यासह अनेक कामे प्रलंबित आहेत. या भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी ताहराबाद व चिखलठाण सबस्टेशनद्वारे मार्ग काढला जाईल. तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.