पालकमंञी पदाचा निर्णय अंतिम निर्णय यांच्याकडे दिलीप वळसे पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे वेट अॅण्ड वाॅच असेच आपले आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील हे आज अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर हाेते. अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलावर त्यांना माध्यमांनी विचारले असताना, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलाबाबत चर्चा आहे. परंतु त्यावर नेमकी काय चर्चा पक्षश्रेष्ठींसमाेर सुरू आहे, याची मला माहिती नाही. पालकमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील. त्यानुसारच कार्यवाही हाेईल. मला याबाबत काहीच माहिती नाही.''
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. काेल्हापूर जिल्ह्यातील कामाचा आवाका वाढल्याने मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत उत्सुक नाहीत. या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली आहे. त्यांच्या या मागणीला अनेक दिवस झाले. त्यानंतर पालकमंत्री पदाबाबत अनेकांची नावे चर्चेत आली. त्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाचा समावेश हाेता. त्यातच ते आज अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर हाेते. त्यांनीच यावर आपल्याला याबाबत काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या नावाच्या चर्चेच्या पूर्णविराम दिल्यासारखे झाले आहे.