महाराष्ट्र
शिर्डी- साईबाबा समाधीचे ११ हजार साई भक्तानी घेतला दर्शनाचा लाभ
By Admin
शिर्डी- साईबाबा समाधीचे ११ हजार साई भक्तानी घेतला दर्शनाचा लाभ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डी : राज्य शासनाच्या आदेशाने आज, ७ ऑक्टोबरपासून पहाटेच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभरात सुमारे ११ हजार साईभक्तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
'जगभरात, देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. ५ एप्रिल पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते,' असे सांगत बानायत म्हणाल्या, '२४ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनाच्या मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे काही अटी शर्तीवर खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच कोरोना व्हायरसचे सावट संपले नसुन साईभक्तांना श्रींचे दर्शन सुलभरित्या व्हावे याकरीता श्रींच्या दर्शन/आरतीचे सर्व पासेस हे ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना संस्थानच्या वतीने करण्यात आल्या. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गेट नंबर २ मधुन प्रवेश देवून व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे ४ व ५ नंबर गेटव्दारे बाहेर जाणे असा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला.' श्री साईबाबांचे मंदिर खुले झाल्यामुळे व संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत साईभक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना यशस्वीपणे नियोजन करण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे प्रयत्नशिल आहेत.
Tags :
325
10