वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची आॕनलाईन सभा
शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत नियोजनपूर्वक इथेनॉल प्रकल्प उभारणी करु- चेअरमन आप्पासाहेब राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : इथेनॉल प्रकल्प उभारणीची पायाभूत कामे, मशिनरी खरेदी, सिव्हील बांधकामे यांच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तर काही कामे सुरूही झालीत. शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत नियोजनपूर्वक इथेनॉल प्रकल्प उभारणी करू, अशी ग्वाही चेअरमन आप्पासाहेब राजळे यांनी दिली.
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. त्यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जि.प.सदस्य राहुल राजळे, व्हाईस चेअरमन रामकिसन काकडे, संचालक उद्धव वाघ, सुभाष बुधवंत, अनिल फलके, डॉ. यशवंत गवळी, साहेबराव सातपुते, शरद अकोलकर, कुशीनाथ बर्डे, नारायण काकडे, उषा खेडकर, बाबासाहेब किलबिले उपस्थित होते.