पाथर्डीत होणार महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पाथर्डी तालुक्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय येथे २८ ऑक्टोंबर गुरवार होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष व पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती तालुका तालीम संघाच्या वतीने देण्यात आली.
निवड चाचणी स्पर्धा फक्त पाथर्डी तालुक्यातील खेळाडूंसाठी असून स्पर्धेकरिता ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ या वजन गट असणार आहे. महाराष्ट्र केसरी गट प्रमाणे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून पाथर्डी तालुक्याचा संघ निवडला जाईल. स्पर्धा सर्व कोरोनाचे नियम पालन करून होणार आहे. स्पर्धेमध्ये पात्र खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन पप्पू शिरसाट, तुकाराम पवार, संदीप कराळे, सुभाष पवार, अजय शिरसाट, सचिन शिरसाट आदी आयोजकांकडून करण्यात आले आहे. गुरवार रोजी सकाळी १० वाजल्या पासून स्पर्धेला सुरवात होणार आहे. वजन घेण्यासाठी सर्व खेळाडूने आपले ओरिजनल आधार कार्ड घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.