पारनेर कारखान्याकडे किरीट सोमय्या यांचा मोर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर येथील पारनेर साखर कारखाना विक्रीच्या चौकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट ईडीकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पारनेर साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांसह इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवार (२३ सप्टेंबर) रोजी पारनेरमध्येभाजप नेते किरीट सोमय्या येणार असल्याची माहिती रामदास घावटे व बबनराव कवाद यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या हे २३ रोजी १२.३० वाजता श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड युनिट पारनेरला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पारनेर येथील शेतकरी सदस्य कामगार ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. दुपारी तीन वाजता पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती बचाव समितीचे रामदास घावटे यांनी दिली आहे.
कारखाना विकत घेणारी खासगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता .राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती . तर पारनेर विकत घेण्यासाठी वापरलेले तेवीस कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे .तर उर्वरीत नऊ कोटी रुपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्या कडून घेण्यात आलेले आहे .आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातुन ही बाब आता उघड झाली आहे, असेही ते म्हणाले.