स्व.गोपीनाथराव मुंडे चौक येथे शेतकऱ्यांसाठी उद्या रास्ता रोको आंदोलन करणार - माणिकराव खेडकर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भालगाव पंचायत समिती गणातील विविध प्रश्नाबाबत गुरुवारी दि.२३ सप्टेबंरला सकाळी ८ वाजता स्व. गोपीनाथराव मुंडे चौक येथे रस्ता रोखो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी दिला आहे.
मागील वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठ पुरावा करूनही पैठण- पंढरपूर आणि खरवंडी कासार लोहा राष्ट्रीय महामार्गामध्ये गेलेल्या जमीनीचा शेतक-यास मोबदला मिळत नाही. रस्त्याच्या बाजुने गटार नसल्याने जमीनीत पावसाचे पाणी जाऊन जमीनीचे नुकसान झाले. त्याचा पंचनामा नाही. स्वतःच्या घरात,शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, अशा अनेक मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दि. २३ सप्टेंबरला ला सकाळी ८:०० वाजता भालगाव येथील स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक( पूर्वीचा उकंडा फाटा) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी भालगाव, मिडसांगवी,मुंगुसवाडे, मालेवाडी, खरवंडी आणि आजुबाजुच्या गावातील ज्यांच्या जमीनी, घरे- दारे या रस्त्यात गेली आहेत किवा बाधीत झाली आहेत, त्या सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन या रस्ता रोको आंदोलनात सामील होण्याचे आवाहन पाथर्डी भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी केले आहे.