पाथर्डी शेवगाव श्रीगोंदे कर्जत जामखेड राहुरी तालुक्यात 17 ठिकाणी घरफोड्या करणारी 'ही' टोळी जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार आग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव व राहुरी परिसरामध्ये (सतरा) ठिकाणी बंद घरफोडणारे तसेच जबरी चोऱ्या करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून 42 तोळे ( 419 ग्रॅम) सोन्याचे दागिणे, रोख 39 हजार 500 रक्कम व तीन दुचाकी असा एकूण 23 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चार आरोपींना अटक करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार राम बाजीराव चव्हाण (रा. आष्टी, जि. बीड) याने घरफोड्या करण्यासाठी काही साथीदारांच्या मदतीने टोळी तयार केली आहे. तो साथीदारांसह सोन्याच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून अहमदनगर येथे येणार आहेत.
या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर- जामखेड रस्त्यावरील आठवड घाट (ता.नगर) येथे सापळा लावला. दुचाकीवरून आलेल्या चौघांना पकडले. त्यांनी त्याची नावे विचारली असता, राम बाजीराव चव्हाण (वय 20, रा. आष्टी), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनाद हबाजी भोसले (तिघे रा. पिंपरखेड, ता. आष्टी) असे सांगितले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता 17 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.