Breaking- 'या' तारखेला 'ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो' आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अन आंदोलन हे जणू समीकरणच. महागाई, भ्रष्ठाचार किंवा इतर अनेक प्रश्न असो अण्णा हजारे यांनी हे प्रश्न आंदोलन करून मार्गी लावले. परंतु आता जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची राळ उठविणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
सदर वृत्त झी न्यूज ने दिले आहे. या वृत्ताच्या हवाल्याने सद वृत्त दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
सतत गॅस दरवाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह, अन्न-धान्यही महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमध्ये असंतोष आहे. हे सर्व होत असताना अण्णा हजारे शांत आणि निवांत कसे आहेत, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी केला आहे.
अण्णा हजारे झोपले असतील तर त्यांना जनतेसाठी उठवण्याची आणि महागाई विरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथील निवासस्थानासमोर 1 जून रोजी 'ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो' आंदोलन करणार आहे अशी माहिती सोमनाथ काशिद यांनी दिली.