पाथर्डी तालुक्यात किरकोळ कारणावरून दोघांवर जीवघेणा हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुका दोन जीवघेण्या हल्ल्यांमुळे हादरला आहे. पहिली घटना तालुक्यातील आल्हणवाडी येथे घडली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून दिनकर आण्णाजी गव्हाणे व संतोष माणिक गव्हाणे यांनी मधुकर आण्णा गव्हाणे (वय - 70) यांच्यावर खोऱ्याने व दगडाने हल्ला केला.
प्रकरणी मधुकर गव्हाणे यांच्या पत्नी शहाबाई यांनी पाथर्डी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी आणि मधुकर गव्हाणे याच्यात काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून 2 नोव्हेंबर रोजी दिनकर आण्णाजी गव्हाणे व संतोष माणिक गव्हाणे यांनी मधुकर गव्हाणे यांच्यावर खोऱ्याने हल्ला केला. तसेच दगडाने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना तालुकातील मिरी येथे घडली आहे. येथील प्रमोद तुकाराम केरकर या 21 वर्षीय तरुणावर पांडुरंग निमसे यांनी तलवारीने हल्ला केला. या प्रकरणी प्रमोद केरकर याने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.