खा. डॉ. सुजय विखे यांचा 'या' रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर-शिर्डी हा रस्ता अहमदनगरच्या विकासासाठी दर्जेदार होणे गरजेचा आहे. परंतु या रस्त्याचे काम
करणार्या ठेकेदाराकडे टक्केवारी मागितली गेली.त्यामुळे रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने 'क्लोजर'ची नोटीस दिली. टक्केवारी मागणार्यांमध्ये
विशिष्ट लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.खासदारीकाला तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांनी अहमदनगर दक्षिण मतदार संघासह
जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा आयोजित पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांवर जोरदार टीका केली. काही विशिष्ट लोकप्रतिनिधींनी
रस्त्यांच्या कामात टक्केवारी माहितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.खा. डॉ. विखे म्हणाले, या रस्त्याच्या कामासाठी आता नव्याने निविदा काढणार आहे. त्यावेळी कोणी ठेकेदाराकडे
टक्केवारी मागितल्यास, त्याचे नाव पुढील वेळेस जाहीर करेल. जिल्हा परिषदेतील टक्केवारीवर बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेत आठ, दहा आणि बारा टक्के, अशी टक्केवारी सुरू आहे.
खासदार विखेंनी हे भाष्य करून जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीला टार्गेट केले. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल, असा दावा करत आता या उड्डाणपुलाचे
काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे खासदार विखेंनी सांगितले.दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याचा विखेंनी आठवण केली.
या कामाचे श्रेय घेणारे अनेक आहेत. काही जण उड्डाणपुलावर जाऊन फोटो काढत आहेत. काहींनी नामकरण देखील केले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या मनातील विकास
कामे जाणून आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत असल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.