पाथर्डी- विविध मागण्यासाठी सरकारी कंत्राटदार संघाचे बेमुदत उपोषण
पाथर्डी- प्रतिनिधी
सरकारी कंत्राटदार संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पंचायत समिती व ग्रामपंचायत या निविदा जाहिराती नोटीस बोर्डावर लावण्यात याव्यात. सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत मार्फत चालू असलेली राजरोस ठेकेदारी वर आळा घालण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून कार्यवाही व्हावी, खरवंडी कासार ग्रामपंचायत निविदा प्रक्रिया गैरप्रकार प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, नोंदणीकृत ठेकेदारांना समान काम मिळण्यासाठी तालुकास्तरीय पंचायत समिती स्तरावर काम वाटप समिती स्थापन करावी, सर्वच कामाची पाहणी करून व देयके वेळेत मिळण्यासाठी गटनिहाय विस्तार अधिकारी नियुक्त करावा व आठ दिवसात पूर्ण केलेल्या कामाचे मूल्यांकन नुसार बिल अदा करावे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी व पाणीपुरवठा उपविभाग पाथर्डी मध्ये कर्मचारी अधिकारी नसल्याने होणारी अडचण दूर करावी. अशा विविध मागण्यांसाठी पाथर्डी तालुका सरकारी कंत्राटदार संघाच्या वतीने उपोषण सुरू केले आहे.
या उपोषण युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय दराडे ,एस. आर. राजगुरू, नितीन शिंदे, रामदास बर्डे ,संतोष खेडकर, सुमित तरवडे ,मंगेश फुंदे, नितीन कीर्तने, मारुती दहिफळे, अंबादास जगताप ,बाळासाहेब खेडकर, ज्ञानेश्वर उगलमुगले ,गणेश शेटे, निलेश वाघ, परमेश्वर शिरसाठ, शुभम मोटे, ताहीर सय्यद, मयूर चव्हाण, किशोर चव्हाण, मनोज पालवे, सचिन म्हस्के आदी कंत्राटदार सहभागी झाले आहेत.