दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या मुलींचे कबड्डी स्पर्धेमध्ये यश
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील
(दि. 15) रोजी झालेल्या पावसाळी तालुकास्तरीय 19 वर्षे आतील मुलींच्या कबड्डी स्पर्धा बाबूजी आव्हाड महाविद्यालय येथे पार पडल्या. या कबड्डी स्पर्धेमध्ये दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कु. राजळे श्रद्धा, कु. नागरगोजे श्रावणी, कु. पवार अमृता,कु. पगारे ऐश्वर्या,कु.राऊत वैष्णवी,कु.ओहळ प्राजक्ता,कु. कांबळे प्रतीक्षा,कु.तुपे आकांक्षा,कु. कचरे अक्षदा,कु.तुपे अकांक्षा या मुलींनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना मार्गदर्शन श्री. तिजोरे यु .आर.प्रा.आदलिंग रोहित( क्रीडा मार्गदर्शक) केले. सर्व विजय खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे, सचिव आर.जे. महाजन व राहुलदादा राजळे, श्री .बी. आर . गोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टेमकर आर.जे.यांनी अभिनंदन केले.