महाराष्ट्र
दरोडेखोरांच्या टोळीला 'मोका'; पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीवर मोकांतर्गत कारवाई
By Admin
दरोडेखोरांच्या टोळीला 'मोका'; पाथर्डी तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीवर मोकांतर्गत कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गृहमंत्री दौऱ्यावर असताना कारागृहातून पळून गेलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर वडूज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये 'मोका' लावण्यात आला आहे.
या टोळीवर औंध, उंब्रज, पुणे, बीड, नगर जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोरी, मारामारी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाच टोळीवर एका आठवड्यात मोकांतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.
होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे, कानिफनाथ उद्धव काळे (दोघे रा. वाकी, ता. आष्टी), जय ऊर्फ आज्या सुभाष भोसले, सचिन ऊर्फ आसी सुभाष भोसले, अविनाश ऊर्फ आवी ऊर्फ महिंद्रा सुभाष भोसले a(सर्व रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि.नगर), राहुल ऊर्फ काळ्या पदू भोसले (रा. वाळुज पारगाव, पो. पाथर्डी, ता.नगर), अतुल लायलन भोसले, धल्ल्या ऊर्फ धर्मेंद्र ननश्या काळे (रा. चिखली, ता. आष्टी), गणेश ऊर्फ बन्सी रंगिशा काळे (रा. राशिन, ता. कर्जत) अशी मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वडूजसह औंध, उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा या घटनांचे प्रमाण वाढले होते. तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची कार्यपद्धती एकच असल्याने पोलिसांनी त्या पद्धतीने गुन्हे करणाऱ्या राज्यातील टोळ्यांकडे मोर्चा वळवला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील संशयितांना ताब्यात घेऊन बोलते केले असता त्यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना त्या पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आले.
गेल्याच आठवड्यात उंब्रज पोलिसांनी मोकांतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्याला त्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 'मोका'चे कलम वाढविण्यात आले. तसाच प्रस्ताव पुन्हा वडूज पोलिसांनीही पाठवला होता. त्यालाही लोहिया यांनी मंजुरी दिली. त्यानंतर आज वडूजच्या गुन्ह्यातही 'मोका' लावण्यात आला.
Tags :
831
10