तहसील कार्यालयातल्या लिपिकास ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तहसिल कार्यालयातल्या गौण खनिज लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केलीय.
सदर लिपिकानं फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये घेतांना लिपिकाला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, यामध्ये शेवगावचे तहसिलदारही रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.
यासंबंधीची कारवाई अद्याप सुरू आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम लिपिक स्वत:साठी घेत होता की यात आणखी कोणी सहभागी आहे, याचा तपास पथक करीत आहे.