कोरोना संपलेला नाही; प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे - बाळासाहेब थोरात
By Admin
कोरोना संपलेला नाही; प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे - बाळासाहेब थोरात
अहमदनगर- प्रतिनिधी
मागील १ वर्षापासून संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून या काळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले.मात्र लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर कोरोनाबाबत अनेकांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे सध्या पुन्हा कोरोना वाढीचा धोका वाढू पाहतो आहे.म्हणून प्रत्येकाने मास्क वापरणेसह स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना थोरात यांनी म्हटले आहे की,कोरोना हे संपुर्ण मानव जातीवरील संकट आहे.मागील १ वर्षापासून संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झाले आहे.महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सरकारला चांगले यश आले.याची आंतरराष्ट्रीय पातळी वर दखल घेतली गेली.कोरोनाची लसही महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे हे मोठे यश आहे.मात्र लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर कोरोनाबाबत काही जणांकडून झालेला निष्का ळ जीपणा,अनेक ठिकाणी वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे.सध्या काही शहरांत कोरोना वाढतो
आहे.कोरोना अद्याप संपलेला नसून स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना कोरोना पासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शास नाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा.
सोशल डिस्टनचे पालन करावे.वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसुत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा ठरणा रा आहे. महाविकास आघाडी सरकारने माझे कुटुंब,माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रात कोरोना रोखण्यापासून चांगला दिलासा मिळाला आहे.कोरोनाचे संकट रोखण्यासाठी स्वयंशिस्त अत्यंत मह त्वाची असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा,कुठेही जास्त गर्दी करू नका,घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा,काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या.निष्काळजीपणा करु नका. शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहनही थोरात यांनी जनतेला केले आहे.