महाराष्ट्र
पालखी दिंडी सोहळ्यात चोरट्यांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By Admin
पालखी दिंडी सोहळ्यात चोरट्यांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पाथर्डी तालुक्यातील 'या' व्यक्तीला अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पालखी सोहळ्यात चोर्या करणार्या 11 महिलांसह एकूण 37 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या विशेष पथकांनी ही कारवाई केली.
किशोर पुंजाराम जाधव (33, रा. पाथर्डी, अहमदनगर), ग्यानदेव बाळा गायकवाड (34, रा. जालना), नितीन अशोक जाधव (25 रा. अक्कलकोट), गणेश जाधव (25, रा. सोलापूर), कुणाल बाळु मोरे (30 रा. दिघी), दत्ता श्रीमंत जाधव (24, रा. गांधीनगर झोपडपटटी), प्रशांत विजय गायकवाड (25, रा.बीड), अविनाश भागवत गायकवाड (19 रा. बीड), विजय सर्जेराव पवार (43, रा. अहमदनगर), आकाश मोहन डुकरे (21, रा.अहमदनगर), बजरंग रघुनाथ पवार, किरण अशोक नेखवाल, विठ्ठल अश्रुबा जाधव, संतोष वसंत गायकवाड, गणेश रामा पिटकर, माधव सखा पवार, ज्ञानेश्वर मधुकरराव जाधव, विजय महींद्रसिंग, राकेश राजु झेंडे, विजय बाळासाहेब गायकवाड, शाम गुणाजी गायकवाड, राया विठठल बडीदकर, राहुल अशोक गंगावणे,
विकास भारत गायकवाड, दामोदरदत्त बबन धोत्रे, सुरज भारत पवार, शांता वसंत गायकवाड, कमल सुरेश जाधव, रेणुका राजु गायकवाड, सारिका भाउसाहेब गायकवाड, हौसाबाई नामदेव कांबळे, कोमल सुनिल गायकवाड, सोनी सागर सकट,
अंजू कृष्णा उपाध्ये, रंजनी प्यारेलाल कांबळे, सविता महोदव गायकवाड, पंचकुली बाबासाहेब गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात होणार्या चोर्यांच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, साध्या वेषात तैनात असलेल्या गुन्हे शाखेने पालखी सोहळ्यातून 37 चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल, पाकीट, दागिने असा अडीच लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, शंकर बाबर, प्रकाश जाधव यांच्यासह विशेष पथकाने ही कारवाई केली
Tags :
47206
10