पाथर्डी- 'या' आरोपीला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी आरोपी दिलीप भगवान बडे (वय २७, रा. चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यास दोषी धरून १ वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद सुनावली आहे.
दिलीप बडे यास दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.
१६ जून २०१९ रोजी रात्री पीडित मुलगी व तिची आई या त्यांच्या घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या असताना आरोपी दिलीप भगवान बडे हा त्याच्या अंगावरील कपडे काढून पीडित मुलीच्या घरासमोर येऊन लज्जास्पद वर्तन केले.
त्यावेळी पीडित मुलीची आई मध्ये पडली असता त्याने तिला उचलून जमिनीवर खाली आपटले. झालेल्या झटापटीत पीडित मुलगी व तिच्या आईला दुखापत झाली. त्यानंतर पीडित मुलीचे वडिलांनाही आरोपीने धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द फिर्याद दिली.
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी आरोपी दिलीप भगवान बडे (वय २७, रा. चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी, जि.
अहमदनगर) यास दोषी धरून १ वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद सुनावली आहे.