आव्हाड महाविद्यालयाचे संजय लोखंडे व महेश आसवलेची वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे विद्यार्थी संजय लोखंडे व महेश आसवले यांची दि. ८ मार्च ते १२ मार्च या कालावधीत चंदिगड विद्यापीठाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
संजय लोखंडे याची ६१ किलो वजनगटात तर महेश आसवले याची ७३ किलो वजनगटात निवड झाली आहे. त्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुभाष देशमुख, राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले.